-MPC-TOP-MOST-BANNER-I

Hinjawadi News: वाहनाला धडक देऊन जखमी चालकाला दमदाटी; तिघांवर गुन्हा दाखल

शनिवारी सकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास आरोपीच्या टेम्पोने हिंजवडी येतील मेझा 9 चौकाजवळ फिर्यादी यांच्या वाहनाला धडक दिली.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – वाहनाला धडक दिल्यानंतर आरोपी वाहन चालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून जखमी वाहन चालकाला दमदाटी करत शिवीगाळ केली. हा प्रकार शनिवारी (दि. 29) सकाळी सव्वा सात वाजता मेझा 9 चौकाजवळ हिंजवडी येथे घडला.

शीतल संजय बन्सल (वय 45, रा. विमाननगर, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो चालक (एमएच 14 सीडी 0181) आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास आरोपीच्या टेम्पोने हिंजवडी येतील मेझा 9 चौकाजवळ फिर्यादी यांच्या वाहनाला धडक दिली. त्यामध्ये फिर्यादी जखमी झाले. त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले. त्यानंतर आरोपींनी उलट फिर्यादी यांनाच दमदाटी आणि शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn