Hinjawadi News : हिंजवडीतून 9 लाख 30 हजार रूपयांचा गांजा जप्त, एकजण ताब्यात

एमपीसी न्यूज – हिंजवडीतून 9 लाख 30 हजार 425 रूपयांचा 37 किलो 217 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. हिंजवडी माण रोड, राक्षेवस्ती याठिकाणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.26) ही कारवाई केली.

विकास विनोद मोंडळ (वय 43, रा. हिंजवडी माण रोड, राक्षेवस्ती ) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर, आरोपी निलेश चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी विकास हा आरोपी निलेश याच्याकडून गांजा विकत घेऊन आपण राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत ठेवला होता. पोलिसांना त्याच्या खोलीत 37 किलो 217 ग्रॅम एवढा 9 लाख 30 हजार 425 रूपयांचा गांजा आढळून आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.