Hinjawadi News : कामवाल्या बाईने 4.86 लाख किंमतीचे दागिने केले लंपास

एमपीसी न्यूज – बंगल्यावर कामाला असलेल्या कामवाल्या बाईने चावीच्या मदतीने कपाटातून 4.86 लाख किंमतीचे सोन्याच्ये दागिने चोरुन नेले आहेत. ही घटना 10 ते 17 सप्टेंबर दरम्यान रामनगर, बावधन पुणे येथे घडली. 

याप्रकरणी सुभाषचंद कपूरचंद गुप्ता (वय 62, रा. रामनगर काॅलनी बावधन पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी फिर्यादी गुप्ता यांच्या बंगल्यावर कामाला असलेल्या कामवाली बाई स्मृती वासुदेव अधिकारी (वय 40, रा. बावधन) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुप्ता यांच्या बंगल्यावर कामाला असलेल्या कामवाली बाई व आरोपी स्मृती अधिकारी हिने बेडरूमच्या ड्राॅव्हर मधून कपाट रुमची चावी घेतली. चावीच्या सहाय्याने कपाटरुम उघडून लाकडी कपाटातील 4 लाख 86 हजार 090 किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.