Hinjawadi News : ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – ट्रकच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 2) रात्री सव्वाआठ वाजता मुंबई – बेंगलोर महामार्गावर वाकड येथे घडला.

शंकर बिहारीलाल पाटील (वय 24, रा. ताथवडे, ता. मुळशी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा लहान भाऊ खिलेशकुमार बिहारीलाल पाटील (वय 22, रा. ताथवडे, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक पांडुरंग मच्छिंद्र चव्हाण (रा. तळये, ता. कोरेगाव, जि. सातारा) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ मुंबई – बेंगलोर महामार्गावरून जात होता. वाकड येथे त्यांना आरोपी ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक हयगयीने, भरधाव वेगात चालवून जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या शंकर पाटील यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.