Hinjawadi News : गुटखा साठवणूक प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून नऊ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 12) दुपारी हिंजवडी येथे करण्यात आली.

शंकर विश्वनाथ कांबळे (वय 23, रा. फेज-1, हिंजवडी) आणि भाऊ बाळू शिंदे (वय 24, रा, मुकाईनगर, हिंजवडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जिलानी मुसा मोमीन यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळे आणि शिंदे यांच्याकडे गुटखा असल्याची माहिती पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास जीशान हॉटेलच्याजवळ असलेल्या वाघजाई पान स्टॉलवर पोलिसांनी छापा टाकला. त्यात नऊ हजार 117 रुपयांचा वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा, मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण 18 हजार 367 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.