Hinjewadi News : हिंजवडीत दोन घरफोड्या ; दोन लाख 60 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या. पहिल्या घटनेत एक लाख 85 हजार 500 रुपये किमतीचे दागिने आणि रोकड चोरीला गेली आहे. तर दुस-या घटनेत टॉवरची 75 हजार रुपये किमतीची बॅटरी चोरीला गेली आहे.

घरफोडीच्या पहिल्या घटनेत प्रकाश रामजीभाई पटेल (वय 40, रा. पांढरे वस्ती, पुनावळे) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 19) सकाळी साडेआठ ते रविवारी (दि. 20) रात्री नऊ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी पटेल यांच्या घराचे सेफ्टी डोअरचे लॉक उघडले. मुख्य दरवाजाचे सेंट्रल लॉक तोडून घरातून एक लाख 85 हजार रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

घरफोडीच्या दुस-या घटनेत सचिन किसन चौधरी (वय 32, रा. लक्ष्मी चौक, मारुंजी) यांनी एका अनोळखी चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी हे आर्या टेलिसिस्टीम या कंपनीत टेक्निशियन म्हणून नोकरी करतात. चौधरी यांची कंपनी मोबाईल टॉवरचे मेंटेनन्सचे काम करते. पुनावळे, ताथवडे, वाकड आणि बालेवाडी येथील 24 टॉवरच्या मेंटेनन्सचे काम फिर्यादी चौधरी पाहतात.

19 फेब्रुवारी रोजी सकाळी ओर्चीड हॉटेलच्या मागे माउली पाडाळे यांच्या जागेत असलेल्या मोबाईल टॉवरची साईट डाऊन दाखवत असल्याने चौधरी यांनी पाहणी केली. त्यावेळी टॉवरच्या बॅकअप केबिनमध्ये असलेली बॅटरी नसल्याचे निदर्शनास आले. एका चोरट्याने 75 हजार रुपये किमतीची 24 सेल असलेली बॅटरी चोरून नेली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.