Hinjawadi : ‘नाईस इंडिया’ कडून ‘पीएम केअर’साठी 33.50 लाखांची मदत

एमपीसी न्यूज – क्लाऊड आणि ऑन-प्रिमाइसेस एन्टरप्राइझ सॉफ्टवेअर सोल्युशन्सची सेवा पुरवणाऱ्या ‘नाईस इन्टरॅक्टिव्ह सोल्युशन्स इंडिया प्रा. लि.’ या कंपनीकडून कोरोना विरूद्ध लढण्यासाठी पीएम केअर रिलीफ फंडाला 33 लाख 50 हजार रुपयांची मदत देऊ केली आहे. ‘नाईस इंडिया’ कंपनीचे प्रमुख विजय गोंडी यांनी याबाबत माहिती दिली. 

विजय गोंडी यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीतील 100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार तर काही कर्मचाऱ्यांनी स्वच्छेने ‘पीएम केअर’साठी निधी देऊ केला आहे. ही सर्व रक्कम एकत्र करून 33.50 लाख रुपयांची मदत कंपनी कडून ‘पीएम केअर’च्या खात्यात जमा करण्यात आली आहे. ‘नाईस इंडिया’ने डोअर स्टेप स्कूल या स्वयंसेवी संस्थेबरोबर मिळून हिंजवडी परिसरातील गरजूंना रेशन व अन्य  जीवनावश्यक गोष्टींची मदत देखील केली आहे.

कंपनीने कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची मुभा देण्यात आली आहे. नाईस इंडिया प्रामुख्याने क्लाऊड आणि ऑन-प्रिमाइसेस एन्टरप्राइझ सॉफ्टवेअर सोल्युशन्सची सेवा पुरवणारी कंपनी आहे. जगातील 150 पेक्षा जास्त देशांमध्ये जवळजवळ 25,000 संस्थांमध्ये या कंपनीच्या सोल्युशनचा वापर केला जातो.

विजय गोंडी यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. या संकटाच्या काळात कर्मचाऱ्यांनी दाखवलेले औदार्य खरंच कौतुकास्पद आहे. कंपनी नेहमीच त्यांचे ग्राहक आणि समाजाप्रती विश्वास आणि बांधीलकीची भावना जपत असते, असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.