Hinjawadi : अदखलपात्र तक्रार दिली म्हणून फिर्यादीच्या समाजाची सोशल मीडियावर बदनामी

एमपीसी न्यूज – एका इसमाविरोधात पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार नोंदवली. यावरून तरुणाने फिर्यादीच्या समाजाची सोशल मीडियावर बदनामी करणारे मेसेज व्हायरल केले. याबाबत बदनामी करणा-या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 मे ते 2 जून या कालावधीत घडला.

अंकुश राजाराम जगताप (रा. मारुंजी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विशाल कैलास जोंजाळे (वय 25, रा. मारुंजी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल यांचे वडील कैलास जोंजाळे यांनी अंकुश विरोधात मागील काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलीस ठाण्यात अदखलपत्र तक्रार दिली. त्याचा राग मनात धरून अंकुश याने जोंजाळे यांच्या समाजाची बदनामी करण्याच्या उद्देशाने फेसबुक या सोशल मीडियावर बदनामीकारक मेसेज व्हायरल केले. याबाबत पुन्हा अंकुश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.