Hinjawadi : वाहतूक पोलिसांना हप्ता देण्यासाठी पैसे मागणाऱ्या एकाला एसीबीकडून वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर अटक

एमपीसी न्यूज – हिंजवडी वाकड हद्दीत वाहन चालविण्यासाठी वाहन चालकाकडून हप्ता मागणा-या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी(दि. 12) हिंजवडी वाहतूक विभाग कार्यालयासमोर करण्यात आली.

भालचंद्र संदीपान कानडे (वय 38, रा. शिंदे वस्ती, म्हारुंजी, पुणे) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय वाहन चालकाने तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे हिंजवडी वाकड परिसरात चालणारी प्रवासी वाहने आहेत. आरोपीने त्यांच्याकडे हद्दीत वाहन चालविण्यासाठी दोन वाहनांसाठी दर महिन्याला 13 रुपये देण्याचे सांगितले. त्याप्रमाणे आरोपीने दोन वाहनांसाठी पाच महिन्यांचे 6 हजार 50 रुपये मागितले. ताडजोडीअंती दोन महिन्यांचे पैसे देण्याचे ठरले, हे पैसे देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.