Hinjawadi : बावधनमध्ये तरुणाकडून पाऊण किलो गांजा जप्त

One pound of cannabis seized from youth in Bawadhan

एमपीसी न्यूज – बावधन येथे एका तरुणाकडून पोलिसांनी 710 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि. 16) केली.

तेजस पुनमचंद डांगी (वय 26, रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई अजित लिंबराज कुटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास बावधन बुद्रुक येथे हरी जय बाबाजी मार्केट नावाच्या दुकानाच्या बाजूला एक तरुण संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे गांजा आहे, अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपी तेजस याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 17 हजार 750 रुपयांचा 710 ग्रॅम वजनाचा गांजा आणि 170 रुपये रोख रक्कम आढळून आली.

हा गांजा आरोपीने विक्री करण्यासाठी चालवला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.