Hinjawadi : नोकरीच्या आमिषाने तरूणीला आठ लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – उच्चशिक्षित तरूणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांनी आठ लाखांचा गंडा घातला. हा प्रकार भोसरी येथे नुकतीच उघडकीस आली आहे.

याप्रकरणी मोहम्मद मुस्कान आलम (वय 20, रा. डब्ल्यु, झेड, 1015, वसईधारापूर, रमेशनगर, दिल्ली) याच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रियंका अमाद पेडणेकर (वय 25, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रियंका उच्चशिक्षित आहे. तिला नोकरीची गरज असतानाच आरोपींनी तिच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. नोकरी लावण्याचे आमिष दाखवून प्रियंकाकडून वेळोवळी 8 लाख 10 हजार रूपये खात्यावर भरण्यास सांगितले. नोकरी न लावताच फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रियंकाने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.