Hinjawadi : क्रेडिट कार्डचे बोनस पॉईंट टाकण्याच्या बहाण्याने तरुणाला 42 हजारांचा गंडा

एमपीसी न्यूज – क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगत क्रेडिट कार्डचे बोनस पॉईंट टाकण्याच्या बहाण्याने एका अज्ञात इसमाने तरुणाला 42 हजारांचा गंडा घातला. ही घटना हिंजवडी येथे घडली.

दिवेश अनिल ठक्कर (वय 26, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 10) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. अज्ञात इसमाने ठक्कर यांना फोन केला. क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असून क्रेडिट कार्ड बोनस पॉईंट टाकायचे असल्याचा बहाणा आरोपीने केला. त्याआधारे ठक्कर यांच्याकडून बँक खात्याची सर्व गोपनीय माहिती घेऊन ठक्कर यांच्या खात्यावरून 42 हजार रुपये ट्रान्स्फर करून फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.