Hinjawadi : उघड्या दरवाजा वाटे लॅपटॉप आणि मोबाईल पळवले; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सकाळच्यावेळी दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या तरुणाच्या खोलीतून अज्ञात चोरट्यांनी दोन मोबाईल फोन आणि लॅपटॉप असा सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 3) सकाळी सव्वासहाच्या सुमारास बालाजी हॉस्टेल हिंजवडी येथे घडली.

दीपककुमार नागराज (वय 24, रा. बालाजी हॉस्टेल, जय मल्हारनगर, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला ला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपककुमार हिंजवडी येथील बालाजी होस्टेलमध्ये राहतात. ते रविवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजातून रूममध्ये प्रवेश केला. रूममधून दोन मोबाईल फोन आणि लॅपटॉप असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.