Hinjawadi : बावधन येथे ट्रकच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडणा-या पादचारी तरुणाला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 12) सायंकाळी साडेसहा वाजता बावधन येथे घडला.

सुरेश रामू चव्हाण (वय 23, रा. म्हस्केवस्ती, रावेत) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ धाऊजी रामू चव्हाण (वय 30) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी के ए 16 / सी 2784 या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी मयत सुरेश हे बावधन येथील अंतर्मना मार्बल अँड टाईल्स या दुकानासमोरून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रकने सुरेश यांना धडक दिली. या धडकेत सुरेश गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी ट्रक चालक ट्रक सोडून घटनास्थळावरून पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.