Hinjawadi : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी तरुण ठार

हा अपघात गुरुवारी (दि. 6) सकाळी पावणे आठच्या सुमारास कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर बालेवाडी स्टेडीयम समोर झाला. : Pedestrian youth Death in collision with unknown vehicle

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 6) सकाळी पावणे आठच्या सुमारास कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर बालेवाडी स्टेडीयम समोर झाला.

सुरज राम (वय 24) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विजयकुमार प्रल्हाद राम (वय 35, रा. खडकवासला, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजयकुमार यांचे मेहुणे  सुरज गुरुवारी सकाळी पावणे आठ वाजता बालेवाडी स्टेडीयम समोरून पायी चालत जात होते. त्यावेळी त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली.

यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुरज यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.