BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : क्रिकेट खेळताना भोवळ आल्याने एकाचा मृत्यू

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – कासारसाई येथे क्रिकेट खेळत असताना भोवळ आल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 10) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

वसीम अजीज मुलानी (वय 32, रा. चिंचवड) यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसीम क्रिकेट खेळण्यासाठी कासारसाई येथे गेले होते. दरम्यान, क्रिकेट खेळताना त्यांना अचानक भोवळ आल्याने ते जमिनीवर कोसळले. मित्रांनी त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. वसीम यांच्या मृत्यूचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.