Hinjawadi : बेकायदेशीररित्या दारू विकणाऱ्या एकावर गुन्हा; 40 लिटर हातभट्टीची दारू जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून  40 लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे.

रसिफल विठ्ठल कुंभार (वय 32, रा. काटेवस्ती, पुनावळे हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अजित कुटे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काटेवस्ती पुनावळे येथे एक व्यक्ती बेकायदेशीररित्या हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पुणे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात छापा मारून 40 लिटर हातभट्टीची दारु आणि अन्य साहित्य असा एकूण दोन हजार 905 रुपयांचा ऐवज जप्त केला.

दरम्यान दारू विक्रेता पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला. याबाबत भारतीय दंड विधान कलम 188 यासह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.