Hinjawadi : हिंजवडी आणि चिखलीमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; चौघांना अटक

एमपीसी न्यूज – हिंजवडी आणि चिखली पोलिसांनी परिसरात सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्यामध्ये चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पांडुरंग भगवान जाधव (वय 27, सध्या रा. डांगे चौक, वाकड. मूळ रा. पोंडुळ, ता. सोनपेठ, जि. परभणी) नागेश गुंडेराव गाडीलवार (वय 30, सध्या रा. तपसे चिंचोली, ता. औसा, जि. लातूर) यांना हिंजवडी पोलिसांनी तर राहुल अशोक बनगर (वय 25, रा. शरदनगर, मोरेवस्ती, चिखली), शशिकांत शंकर भगरे (वय 37, रा. साने चौक, मोरेवस्ती) यांना चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हिंजवडी पोलीस परिसरात गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे यांना माहिती मिळाली की, भूमकर चौकाजवळ जय, मातादी हॉटेलच्या पाठीमागे कल्याण-मुंबई नावाचा मटका सुरु आहे. लोकांना चिठ्ठ्या देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन मटका जुगार चालवला जात आहे. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून पांडुरंग आणि नागेश यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण एक हजार 190 रुपयांचा ऐवज जपत केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

चिखली पोलीस मोरेवस्ती परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक एन एस नाणेकर यांना माहिती मिळाली की, मोरेवस्ती येथे हनुमान मंदिराच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम मटका जुगार अड्डा चालवत आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राहुल आणि शशिकांत यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण एक हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.