Hinjawadi : गिझरची दुरुस्ती पडली महागात; अनोळखी व्यक्तीने घातला साडेपाच लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – नंबर काढला. त्यावरून बोलगिझर बिघडल्याने तो दुरुस्त (Hinjawadi) करण्यासाठी गुगलवरून संबंधित कंपनीच्या सर्विस सेंटरचाणाऱ्या तोतया कर्मचाऱ्याने महिलेला कंपनीची मेंबरशीप घेण्यास सांगत बँकेची गोपनीय माहिती घेत पाच लाख 40 हजारांची फसवणूक केली. ही घटना 11 सप्टेंबर रोजी हिंजवडी फेज दोन येथे घडली.
याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8509336104 या मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातील गिझर खराब झाला. तो दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या सासरे यांनी गुगलवर सर्च करून बजाज इलेक्ट्रिकल सर्विसेसचा 8509336104 हा क्रमांक फिर्यादीस दिला. फिर्यादी यांनी त्यावर संपर्क केला असता फोनवरील व्यक्तीने तो बजाज कंपनीतून बोलत असल्याचे भासवले.
त्यानंतर गिझर दुरुस्त करण्यासाठी कंपनीची मेंबरशीप घ्यावी लागेल असे सांगत फिर्यादीस एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्याद्वारे आरोपीने फिर्यादी यांच्या बँकेतून प्रथम 91 हजार 65 रुपये, त्यानंतर एक हजार 950 रुपये काढले.
त्यानंतर फिर्यादीच्या नावावर तीन लाख रुपये कर्ज काढले. दुसऱ्या बँक खात्यातून एक लाख 47 हजार रुपये काढत फिर्यादीची एकूण पाच लाख 40 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास (Hinjawadi) करीत आहेत.