Hinjawadi : रिक्षा चालकाने साथीदाराच्या मदतीने लुटले प्रवाशाला!

एमपीसी न्यूज : रिक्षा चालक व साथीदाराने (Hinjawadi) प्रवाश्याकडून 2 मोबाईल व 1 लॅपटॉप असे एकूण 60,000 किंमतीचा मुद्देमाल चोरला. ही घटना हिंजवडी आयटीपार्कमध्ये बुधवारी (दि. 23 नोव्हेंबर) दुपारी घडली.

याबाबत रघु प्स्फूलेटी (वय 25 वर्षे, रा. हिंजवडी फेज 1) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनोळखी रिक्षा चालक व त्याच्या साथीदाराविरोधात भा.द.वि कलम 392, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Transformer fire : दत्तवाडी येथे सकाळी ट्रान्सफॉर्मरला लागली आग

फिर्यादी त्यांच्या कंपनीतून घरी जाण्यासाठी हिंजवडी येथून रिक्षामध्ये (Hinjawadi) बसले असता रिक्षा चालकाने त्याच्या रिक्षामधून फिर्यादी यांना टीपटॉप हॉटेलच्या पाठीमागील कन्स्ट्रक्शन साईटजवळ घेऊन जाऊन फिर्यादी यांच्याकडील १० हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, 20,000 रुपये किंमतीचा ॲपल कंपनीचा मोबाईल व 30,000 रुपये किंमतीचा लॅपटॉप असे एकूण 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादी यांच्याकडून बळजबरीने लुटला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.