Hinjawadi : बावधनमधील टोयोटा शोरूममध्ये चोरी; चोरट्याने एलईडी टीव्हीसह पळविला 47 हजार रुपयांचा ऐवज

एमपीसी न्यूज – बावधन येथे असलेल्या कोठारी टोयोटा शोरूममध्ये चोरी झाल्याचा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याने एलईडी टीव्ही आणि रोकड असा एकूण 47 हजार 664 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 24) सकाळी साडेआठच्या सुमारास उकडीस आली.

विशाल कालिदास गिरस (वय 30, रा. कसबा पेठ, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथे कोठारी टोयोटा शोरूम आहे. गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने शोरूमच्या मागच्या बाजूला असलेल्या बाथरूमच्या खिडकीची काच तोडून त्यावाटे शोरूममध्ये प्रवेश केला. शोरूममधून एलईडी टीव्ही, रोख रक्कम असा एकूण 47 हजार 664 रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याचे विशाल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.