Hinjawadi : बस प्रवासादरम्यान ज्येष्ठ नारिकाचे एक लाखाचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – शिवशाही बसने प्रवास करणा-या ज्येष्ठ नागरिकाच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारत सहा तोळ्यांचे सोन्या-चांदीचे एक लाख 11 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार शुक्रवारी (दि. 3) दुपारी दोन ते सायंकाळी पाचच्या सुमारास सातारा ते वाकड बसथांब्या दरम्यानच्या प्रवासात घडला.

कोंडीराम श्रीरंग देशमुख (वय 71, रा. पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देशमुख शुक्रवारी शिवशाही बसने प्रवास करीत होते. त्यावेळी त्यांच्या पिशवीत एका पर्समध्ये डब्यात सहा तोळे एक ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे एक लाख 11 हजार रुपये किमतीचे दागिने ठेवले होते. फिर्यादी यांची नजर चुकवून चोरट्याने ते दागिने चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.