Hinjawadi : कम्फर्ट इन हॉटेल मधील सेक्सरॅकेटचा पर्दाफाश; तीन विदेशी महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – ढवळे साखरे वस्ती हिंजवडी येथील कम्फर्ट इन हॉटेलवर छापा मारत तेथे चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. यामध्ये दोन उझबिकिस्तान आणि एक ओडिशा येथील महिलेची सुटका करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (दि. 3) रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली.

लालू अजुब शेख (वय 37, रा. सम्राट नगर, फेमस बेकरी, ओम शांती चाळ, मुंब्रा, मुंबई), सागर भास्कर शेट्टी (वय 47, रा. कम्फर्ट इन हॉटेल, लक्ष्मी चौक, हिंजवडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी चौक हिंजवडी येथील कम्फर्ट इन हॉटेलवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून हॉटेलवर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी तीन महिलांची सुटका करत दोन आरोपींना अटक केली. आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.