Hinjawadi : लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

Sexual abuse of a young woman by showing lust for marriage तरुणी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तरुणी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जानेवारी 2020 ते मार्च 2020 या कालावधीत आदर्शनगर हिंजवडी आणि काळाखडक वाकड येथे घडली.

चंदन मंडल (वय 20, रा. काळा खडक, वाकड. मूळ रा. कलकत्ता, पश्चिम बंगाल) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी हिंजवडी येथील एका चहाच्या दुकानात काम करत होती. त्यावेळी आरोपीने तरुणीसोबत ओळख करून मैत्री केली. त्यानंतर आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि जानेवारी ते मार्च 2020 या कालावधीत आदर्शनगर हिंजवडी आणि काळा खडक वाकड येथे तरुणीवर जबरदस्तीने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. तरुणी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like