Hinjawadi : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ( Hinjawadi ) तरुणासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2017 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान हिंजवडी आणि वाकड परिसरात घडला.

प्रतिक काशिनाथ साखरे (वय 28, रा. वडजाई नगर, माण रोड,हिंजवडी) यांच्यासह दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने मंगळवारी (दि. 20) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Sharad Pawar : शरद पवार यांच्या ‘ पक्षाला तुतारीवाला माणूस ‘हे नवं निवडणूक चिन्ह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतीक याने फिर्यादी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत तिला मारहाण केली. आरोपी महिलांनी देखील त्यांच्या लग्नाला विरोध करीत तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, तरुणी वाईट धंदा करते, असे सांगून आरोपीने तिची बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत ( Hinjawadi )आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.