Hinjawadi : घरफोडी करून चांदीच्या वस्तू व रोख रक्कम चोरीला; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – बंगल्याचा दरवाजा कडीकुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांने लॅचलॉक तोडून घरामध्ये प्रवेश केला. बंगल्यातील कपाटाच्या लॉकरमधून हि-याचे दागिने, सोन्याच्या वस्तू व रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मुळशी तालुक्यातील सोसायटी खुर्द येथे 31 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत घडली.

डॉ. रविंद्र रघुपतीकट्टी (वय 64, रा. वैदेही एन्क्लेव्ह बंगलो, सोसायटी खुर्द, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. रवींद्र यांचा बंगला 31 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत लॅचलॉक लावून बंद होता. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी लॅचलॉक व कडीकोयंडा तोडून बंगल्यात प्रवेश केला. हॉलमधील कपाटाच्या लॉकरमधील 67 हजार 500 रुपये किंमतीचे हि-याचे दागिने, चांदीच्या वस्तू व रोक रक्कम चोरून नेली. तसेच हॉलमधे ठेवलेला लॅपटॉपही चोरून नेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.