BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : पैशांच्या व्यवहारावरून अल्पवयीन मुलाचे अपहरण

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – कर्ज म्हणून घेतलेल्या एकूण रकमेपैकी दहा ते अकरा हजार रुपये राहिले असता ते पैसे थोड्या दिवसांनी देतो असे म्हणाल्यावरून एका तरुणाने कर्जदाराच्या पंधरा वर्षीय मुलाचे अपहरण केले. ही घटना मंगळवारी नऊच्या सुमारास मेरे दत्तवाडी येथे घडली.

याप्रकरणी 36 वर्षीय इसमाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अरुण शिवाजी जाधव (वय 28, रा. निर निमगाव, ता. इंदापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण आणि फिर्यादी हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात पैशांचा व्यवहार होता. मंगळवारी सकाळी अरुण फिर्यादी यांना कर्जाची रक्कम पाच लाख रुपये मागितले. त्यावर फिर्यादी यांनी कर्जाची सर्व रक्कम दिली असून दहा ते अकरा हजार बाकी आहेत, असे सांगितले. उर्वरित रक्कम थोड्या दिवसात देतो असे म्हणून फिर्यादी कामावर गेले. पैसे न देता निघून गेल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांच्या पंधरा वर्षीय मुलाला फूस लावून पळवून नेले. शोधाशोध केल्यानंतर मुलगा सापडला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलिसांनी अरुण याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अंगज तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.