Hinjawadi : मेंटेनन्स मागितला म्हणून सोसायटी खजिनदारास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – थकीत मेंटेनन्स, फ्लॅटची ट्रान्सफर फीस मागिलती म्हणून तिघांनी सोसायटी खजिनदार व त्याच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.11) रात्री अकराच्या सुमारास हिंजवडी येथील साहिल विग्नेश रेसिडेन्सी (Hinjawadi) येथे घडाला.

याप्रकरणी गणेश यशवंत शेवकरी (वय 35 रा.हिंजवडी) यांनी फिर्याद दिली असून संजय देवराम टेमकर (वय 49 रा.पुणे) याला अटक केली असून अनिल बहिरट व सुनिल दिवेकर यांच्यावरही गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Bavdhan : बायकोला त्रास देतो म्हणून लोखंडी रॉडने मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेमकर याने सोसायटीमध्ये 1201 क्रमांकाचा फ्लॅट घेतला आहे. मात्र त्याने थकीत मेंटेन्स, फ्लॅटची ट्रान्सफर फीस व सिकींग फंड असे 51 हजार रुपये भरलेले नाहीत. सोसायटीचे खजिनदार या नात्याने शेवकरी यांनी त्याच्याकडे पैसे मागितले. याचाच राग मनात धरून आरोपीने त्याच्या मित्राच्या मदतीने (Hinjawadi) फिर्यादीला मारहाण केली.

त्यांना वाचविण्यासाठी त्यांचा भाऊ विकी शेवकरी मध्ये आला असता आरोपीने त्याचा ही गळा आवळण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने कसेबसे भावाला सोडवले असता आरोपींनी फिर्यादी यांचे वडील यांनाही पोटात लाथा बुक्क्या मारल्या. यावरून हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली असून पुढिल तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.