Hinjawadi : बायकोला नांदायला पाठवत नाही म्हणून जावयाचा संताप; सासुरवाडीच्या तिघांवर वार

Hinjawadi: Son-in-law attacked three in-laws as they do not send his wife with him

एमपीसी न्यूज – बायकोला नांदवायला पाठवत नाही म्हणून संतापलेल्या जावयाने सासरा, मेहुणा आणि मेहुण्याचा पुतण्या यांच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना सोमवारी (दि. 8) रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास हिंजवडीजवळील माण येथे घडली.

शिवाजी भिकाजी सोरटे (वय 55, रा. एकता कॉलनी, डांगेचौक, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या जावयाचे नाव आहे. याबाबत त्याचा मेहुणा बाजीराव बबन ओझरकर (वय 32, रा. ओझरकरवाडी, माण, ता. मुळशी) यांनी मंगळवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजी सोरटे याने आपली पत्नी व मुलांना आपल्या घरी नांदायला पाठवत नाही, या कारणावरून कोयत्याने फिर्यादी बाजीराव ओझरकर, त्यांचे वडिल भिकाजी आणि बाजीराव यांचा पुतण्या दीपक यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.