Hinjawadi : चार लाखांचे बांधकाम साहित्य चोरणारा अटकेत

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवरून रोज थोडे-थोडे करत तब्बल चार लाखांचे बांधकाम साहित्य चोरणाऱ्याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा चोरीचा प्रकार मागील दिड महिन्यापासून सुरु होता. महेश सिताराम दमाई (वय 24, रा. मुळशी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शरद दगडू राठोड (वय 33, रा.हिंजवडी) यांनी हिंजवडी (Hinjawadi) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मागील एक ते दिड महिन्यापासून पारखे वस्ती येथील महाराजा फर्निचरच्या मागे असलेले बांधकामचे स्टील व इतर सामान चोरी होत होते. यावरून फिर्यादी यांनी पोलीस तक्रार दिली. पोलीस व फिर्यादी यांनी पाळत ठेऊन आरोपीला शनिवारी (दि.13) मध्यरात्री रंगेहाथ पकडले.

यावेळी त्याने तब्बल 2 लाख रुपयांचे साहित्य व 2 लाख 18 हजार रुपयांचे बांधकामाचे स्टील व लोखंडी गट्टू असा एकूण 4 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे (Hinjawadi) उघड झाले. हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Moshi : मोशी येथून गोमांस सदृश्य 127 किलो मांस जप्त

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.