Hinjawadi Suicide News : दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

ही घटना रविवारी (दि. 9) दुपारी हिंजवडीजवळील जांबे येथे घडली. : Suicide a child who has passed 10th

एमपीसी न्यूज – दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 9) दुपारी हिंजवडीजवळील जांबे येथे घडली. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

अनिकेत गणेश जगताप (वय 17, रा. जांबे, ता.मुळशी, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

अनिकेत याने रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास राहत्या घरात अभ्यासाच्या खोलीत दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब त्याच्या आजोबांच्या लक्षात आली.

आजोबांनी अनिकेतला त्वरीत पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

अनिकेत हा नुकताच दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. यामुळे तो आणि त्याचे कुटुंबीय आनंदात होते.

अकरावीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी त्याची तयारीही सुरू होती. मात्र, त्यापूर्वीच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.