Hinjawadi : पुलाच्या कामादरम्यान सापडले रणगाड्याचे बॉम्बशेल

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माण-मारुंजी रस्त्यावर पुलाच्या कामादरम्यान रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले. हिंजवडी पोलिसांनी हे बॉम्बशेल ताब्यात घेऊन संरक्षण विभागाच्या ताब्यात दिले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात (Hinjawadi ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, माण-मारुंजी रस्त्यावर ब्ल्यू रिच सोसायटीच्या पाठीमागील बाजूला पुलाचे काम सुरु आहे. सोमवारी (दि. 3) जेसीबीने खोदकाम करत असताना बॉम्बसदृश वस्तू आढळून आली. त्यामुळे तत्काळ याबाबत पोलिसांना (Hinjawadi ) माहिती देण्यात आली.

Chikhali : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू 

हिंजवडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित वस्तूची पाहणी केली. त्रयामध्णये गाड्याच्या बॉम्बचा पुढील भाग (बॉम्बशेल) असल्याचे आढळून आले. मात्र हे बॉम्बशेल खूप जुने असल्याने त्याला सुरक्षितपणे संरक्षण विभागाच्या ताब्यात देण्यात आले.संरक्षण विभागाकडून त्याची पाहणी करून त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.

चार महिन्यांपूर्वी सापडले होते हातबॉम्ब

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यान बाणेर येथे 5 डिसेंबर 2023 रोजी जुने हातबॉम्ब सापडले होते  तेव्हा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत  लगेच माहिती दिली. चतुश्रुंगी पोलीस आणि बॉम्बशोधक  पथकाने (बीडीडीएस) बॉम्ब सुरक्षित स्थळी हलवले असून ते ब्रिटीशकालीन बॉम्ब असल्याचे म्हटले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.