BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : ‘मी मारतोय पोलिसांना सांग, नाहीतर घरी येऊन मारीन’ म्हणत तरुणाची दाम्पत्याला मारहाण

एमपीसी न्यूज – ‘तू पोलिसांना सांग, मी तुला मारतोय आणि तू असे सांगितले नाही, तर मी तुला तुझ्या घरी येऊन मारीन’ अशी धमकी देत एका तरुणाने कारमधून जाणा-या दाम्पत्याला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 1) दुपारी दीडच्या सुमारास सुसरोड, हिंजवडी येथे घडली.

सिद्धेश्वर इंद्रमणी जेना (वय 40, रा. बाणेर, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चेतन खेडेकर (वय 25, रा. सुतारवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर त्यांची पत्नी आणि मुलासोबत सूसरोड येथून गाडीतून जात होते. ते बॉटल रॉक हॉटेल समोर आले असता चेतन त्याच्या एका साथीदारासोबत दुचाकीवरून आला. त्याने सिद्धेश्वर यांच्या गाडीवर दगड मारून गाडीचे नुकसान केले. त्यानंतर त्याने सिद्धेश्वर आणि त्यांच्या पत्नीला हाताने आणि दगडाने मारहाण केली. चेतन याने सिद्धेश्वर यांच्या पत्नीसोबत असभ्य वर्तन करत तिचा विनयभंग केला.

चेतन याने जेना दाम्पत्याला शिवीगाळ करत ‘तू पोलिसांना सांग, मी तुला मारतोय. तू असे सांगितले नाही तर मी तुला तुझ्या घरी येऊन मारीन’ अशी धमकी दिली. जेना यांनी पोलिसांना असे सांगितले असता हिंजवडी पोलीस तात्काळ घटनास्थळी आले. पोलिसांना पाहताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.