Hinjawadi : टेम्पोची दुचाकीला धडक; पती गंभीर जखमी, पत्नीचा मृत्यू

Tempo hit the bike; Husband seriously injured, wife Dead ;अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या टेम्पोने दुचाकीला मागून जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरून जात असलेले पती-पत्नी रस्त्यावर  पडले.  त्यात पती गंभीर जखमी झाला असून पत्नीचा मृत्यू झाला.

हा अपघात रविवारी (दि. 26) दुपारी दीड वाजताच्या सुमारास भूमकर चौकात झाला. याबाबत मंगळवारी (दि. 28)  टेम्पो चालक राहुल दत्तू पोटकुले (वय 33, रा. कात्रज. मूळ रा. जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गणेश मारुती खोल्लम (वय 37, रा. कात्रज) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दीड वाजता फिर्यादी गणेश आणि त्यांच्या पत्नी दुचाकीवरून (एमएच 12 / जेबी 1757) वाकडकडून पुण्याकडे जात होते.

भूमकर चौकात  सयाजी हॉटेल समोर   भरधाव वेगात जाणा-या टेम्पोने (एमएच 48 / एजी 4760) गणेश यांच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली.

या अपघातात गणेश आणि त्यांच्या पत्नी रस्त्यावर  पडले. गणेश हे गंभीर जखमी झाले तर त्यांच्या पत्नीचा अपघातात मृत्यू झाला आहे.

अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.