Hinjawadi : मुंबई-बेंगळुरु महामार्गावर उड्डाणपुलावरून कार नदीपात्रात कोसळली; पती -पत्नी गंभीर जखमी

The car crashed into a riverbed from the flyover on the Mumbai-Bengaluru highway; Husband and wife seriously injured

एमपीसी न्यूज – मुंबई-बेंगळुरु महामार्गावर वाकड येथे मुळा नदीवरील उड्डाणपुलावरून कार नदी पात्रात कोसळली. यामध्ये कारमधील पती -पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. 1) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

राजीव दुबे आणि त्यांची पत्नी (नाव पत्ता माहिती नाही) हे दोघेजण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी राजीव दुबे आणि त्यांच्या पत्नी कारमधून (एमएच 14 / एफयू 4764) मुंबई-बेंगळुरु महामार्गावरून देहूरोडच्या दिशेने जात होते. त्यावेळी वाकड येथील मुळा नदीवरील उड्डाणपुलावरून त्यांची कार अचानक नदी पात्रात पडली.

या अपघातात दुबे पती-पत्नी दोघेही जखमी होऊन बेशुद्ध झाले आहेत.

या बाबत माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like