Hinjawadi : तोंडाला मास्क न लावता विरुद्ध दिशेने डबल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल

The country has filed a case against two-wheelers without masks : तोंडाला मास्क न लावता विरुद्ध देशाने डबल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- तोंडाला मास्क न लावता दुचाकीवरून विरुद्ध दिशेने डबल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि.5) सायंकाळी सहा वाजता हिंजवडी फेज 1 येथील शिवाजी चौकाजवळ करण्यात आली.

सुधीर महेंद्र गोस्वामी ( वय, 34, रा. खेसे पार्क, धानोरी, पुणे) आणि कैलास काशिनाथ कलशेट्टी (वय. 33, रा. कस्पटे वस्ती, वाकड), अशी गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वारांची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

याप्रकरणी हिंजवडी वाहतूक शाखेचे पोलीस नाईक अमोल जनार्दन बनसोडे (वय, 34) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुधीर गोस्वामी हा तोंडाला मास्क न लावता वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करत विरुद्ध दिशेने दुचाकी चालवत होता. तसेच दुचाकी वरून एकालाच प्रवासाची परवानगी असताना डबल सीट दुचाकी चालवत हिंजवडी फेज 1 कडून शिवाजी चौकाकडे जात होता.

याबाबत पोलीस नाईक अमोल बनसोडे यांनी त्याला अडवून नियम तोडल्याबद्दल जाब विचारला असता दोन्ही आरोपींनी बनसोडे याच्या हाताला व शर्टला पकडून शिवीगाळ केली. तसेच त्यांची नेम प्लेट तोडून डोक्यात हेल्मेट मारले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like