BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : पेट्रोलपंप विचारण्याच्या बहाण्याने तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज – पेट्रोलपंप विचारण्याच्या बहाण्याने दोघांनी पादचारी तरुणाला मारहाण करून लुटले. सोन्याची अंगठी, ब्रेसलेट आणि चेन असा एकूण 68 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर मुळा नदीच्या पुलाजवळ शुक्रवारी (दि. 28) रात्री अकराच्या सुमारास घडली.

प्रसाद प्रकाश माने (वय 30, रा. आंबेगाव पठार, कात्रज) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद शुक्रवारी रात्री देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरून पायी जात होते. मुळा नदीच्या पुलाजवळ आले असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना ‘पेट्रोलपंप कोठे आहे?’ असे विचारले.

यानिमित्ताने दोघेजण दुचाकीवरून खाली उतरले आणि प्रसाद यांना मारहाण केली. त्यानंतर चोरट्यांनी प्रसाद यांच्या हातातील सोन्याची अंगठी, ब्रेसलेट आणि चेन असा एकूण 28.5 ग्रॅम वजनाचा 68 हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.