मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Hinjawadi : बांधकाम साईटवरील साहित्य चोरणाऱ्यास सुरक्षारक्षकाने रंगेहात पकडले

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवरील (Hinjawadi) साहित्य चोरणाऱ्यास पाठलाग करून सुरक्षारक्षकाने रंगेहात पकडले व पोलिसांच्या हवाली केले. ही घटना गुरुवारी (दि. 29) रात्री हिंजवडी येथे घडली. 

संतोष सतीश गायकवाड (वय 24, रा. वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षक ऋषिकेश आरबाड (वय 20, रा. माणगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dehuroad News: गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील अग्निशमन केंद्राच्या (Hinjawadi) समोरील बाजूस असलेल्या एका साईटवर फिर्यादी सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. फिर्यादी हे काम करत असलेल्या साईट वरून आरोपी संतोष गायकवाड प्लेट घेऊन जात असताना आढळला. फिर्यादी यांनी त्याला अडवून विचारपूस केली. त्यावेळी तो पळून जाऊ लागला फिर्यादींनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Latest news
Related news