Hinjawadi : घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञातांनी पेटवली

एमपीसी न्यूज – घरासमोर रात्री पार्क केलेली दुचाकी अज्ञातांनी पेटवून दिली. ही घटना मंगळवारी (दि. 18) पहाटे मारुंजीगाव येथे उघडकीस आली.

गजानन काशीराम सुरळकर (वय 23, रा. मारुंजीगाव, हिंजवडी) याने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन मारुंजीगाव येथे लाईफ रिपब्लिक सोसायटीच्या मागे चव्हाण मळ्यात राहतो. त्याने त्याची दुचाकी (एमएच 14 / एचए 0392) सोमवारी रात्री घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञातांनी त्याची दुचाकी पेटवून दिली.

रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार समोर आला. दुचाकीची आग विझवण्यात आली. मात्र, यामध्ये दुचाकीचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.