Hinjawadi : शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी

एमपीसी न्यूज – संपूर्ण कुटुंब शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी गेले. दरम्यान, बंद घरामध्ये प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 28 जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी फेज तीन येथे उघडकीस आली.

साईप्रदीप व्यंकटेश्वर राव पर्वतनेनी (वय 32, रा. हिंजवडी फेज तीन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जुलै रोजी साईप्रदीप यांचे संपूर्ण कुटुंब देवदर्शनासाठी शिर्डी येथे गेले. दरम्यान, त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरटयांनी किचनच्या स्लायडिंग खिडकीतून घरात प्रवेश केला. घरातून 64 हजार 900 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली.

साईप्रदीप देवदर्शन करून 28 जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.