Hinjawadi: जांबेगावात चोरट्यांनी घरात आणि मंदिरात केली चोरी

Hinjawadi: Theft in temple and house in jambegaon ...म्हणून घरातील सर्वजण गेले होते दुसरीकडे राहायला

एमपीसी न्यूज – गल्लीत कोरोना रुग्ण सापडल्याने घराला कुलूप लावून कुटुंब तात्पुरते दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. रुग्ण बरा झाल्यानंतर आपल्या घरी चोरी झाल्याचे कुटुंबाच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी गल्लीत असलेल्या एका मंदिरात देखील चोरी केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 27) उघडकीस आली आहे.

एकनाथ धोंडिबा तनपुरे (वय 36, रा. कानपिळे वस्ती, जांबेगाव, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनपुरे कुटुंब राहत असलेल्या चाळीत 8 जुलै रोजी कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला. त्या रुग्णाला चाळीतच क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यामुळे तनपुरे कुटुंब काही दिवसांसाठी दुसरीकडे राहण्यास गेले. दरम्यान त्यांचे कुलूप लावून बंद होते.

संशयित रुग्ण बरा झाल्यानंतर सोमवारी तनपुरे त्यांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांना घराचा कडी-कोयंडा उचकटलेले दिसले. त्यांनी घरात पाहणी केली असता चोरट्यांनी घरातून टीव्ही, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 22 हजारांचा ऐवज चोरल्याचे उघडकीस आले.

चोरट्यांनी तनपुरे यांच्या घराजवळील वाघजाई माता मंदिरातील दानपेटीतील 1100 रुपयांची रक्कमही चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.