Hinjawadi Crime News : पोटमाळ्याची भिंत फोडून ज्वेलर्सच्या दुकानात दीड लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – पोटमाळ्याची भिंत फोडून ज्वेलर्सच्या दुकानातून एक लाख 55 हजार रुपये किमतीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल फोन चोरट्यांनी चोरून नेले. चोरीचा हा प्रकार गुरुवारी (दि. 17) सायंकाळी सात ते शुक्रवारी (दि. 18) सकाळी नऊ या कालावधीत जगदंबा ज्वेलर्स, हुताम्मा चौक, बावधन बुद्रुक येथे घडला.

विष्णू काळूराम वर्मा (वय 21, रा. बावधन बुद्रुक, पुणे, मूळ रा. आसीन्ड, जि. भिलवाडा, राजस्थान) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार घरफोडी प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चोरट्याने जगदंबा ज्वेलर्स शॉप व शेजारील फ्लेवर दुकानाच्या काॅमन भिंतीस भोक पाडून त्यातून फिर्यादीच्या दुकानात प्रवेश केला. दुकानातील एक लाख 55 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल फोन चोरी करून नेले.

पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.