Hinjawadi : पेइंग गेस्टच्या खोलीत नोकराने केली चोरी; एक लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – पेइंग गेस्टला चाकूचा धाक दाखवून नोकर आणि त्याच्या तीन साथीदार चोरट्यांनी एक लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 26) पहाटे तीनच्या सुमारास लक्ष्मी चौक हिंजवडी येथे घडली.

सागर अँथनी रेड्डी (वय 36, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नोकर दीपेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याच्या तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर लक्ष्मी चौकातील अम्मा हॉस्टेल येथे पेइंग गेस्ट म्हणून राहतात. त्यांच्याकडे आरोपी दीपेश साफसफाईचे काम करतो. त्याने रविवारी पहाटे त्याच्या तीन साथीदारांना सोबत घेऊन सागर यांची खोली उघडली. एकाने घरातील चाकू घेऊन त्याचा सागर यांना मारण्याची धमकी दिली.

सागर यांच्याकडून कपाटाची चावी घेऊन कपाटातून एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पळ काढला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.