Hinjawadi : दारू प्यायला पैसे नव्हते म्हणून त्याने ‘पीक अप टेम्पो’ पळविला

एमपीसी न्यूज – दारू पिण्याचे व्यसन अत्यंत घातक असते, याचा प्रत्यय हिंजवडी परिसरात आला आहे. एका बेवड्याने दारू पिण्यासाठी पैसे नव्हते म्हणून चक्क ‘पीक अप टेम्पो’ चोरल्याचे समोर आले आहे. हिंजवडी पोलिसांनी बेवड्या ‘पीक अप टेम्पो’सह चोरट्याला अटक केली आहे.

कालिदास प्रकाश केदारी असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस भूमकर चौक वाकड येथे गुंडा स्कॉड कारवाई करीत होते. त्यावेळी एक पीक अप भूमकर चौकाकडे येत असल्याचे दिसले. पोलिसांनी पीकअपला अडवून तपासणी केली असता ती पीक अप गाडी चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पीक अप चोरल्याची कबुली दिली.

कालिदास याला दारूचे व्यसन आहे. त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने त्याने हिंजवडी परिसरातून पीक अप टेम्पो चोरल्याचे सांगितले. कालिदास हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर वाकड आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like