Hinjawadi : घरासमोर पार्क केलेला ट्रॅक्टर चोरट्यांनी पळवला

Thieves snatched a tractor parked in front of the house

एमपीसी न्यूज – घरासमोर पार्क केलेला ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 8 जून रोजी सकाळी बोडकेवाडी, हिंजवडी येथे उघडकीस आली आहे. याबाबत मंगळवारी (दि. 16) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुधीर मछिंद्र गोडांबे (वय 33, रा. बोडकेवाडी, फेज दोन, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोडांबे यांच्याकडे जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर आहे. त्यांनी त्यांचा तीन लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर (एमएच 12 / क्यूटी 3350) 7 जून रोजी रात्री अकरा वाजता घरासमोर पार्क केला.

रात्री अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टर चोरून नेला. हा प्रकार 8 जून रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आला.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.