Hinjawadi : चोरट्यांनी हिंजवडी, वाकड, मोशी, चाकण परिसरातून दीड लाखांच्या चार दुचाकी पळविल्या!

एमपीसी न्यूज – हिंजवडी, वाकड, मोशी आणि चाकण परिसरातून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 45 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी शनिवारी (दि. 4) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

वैशाली संतोष बोराटे (वय 26, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वैशाली यांनी त्यांची 70 हजार रुपये किमतीची अॅव्हेंजर मोटारसायकल (एम एच 12 / एन के 4216) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 3) रोजी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

बिभीषण विठ्ठल सुरवसे (वय 39, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरवसे यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 14 / बी एस 7367) लॉक करून घरासमोर 26 डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

विरेश सिद्धरामअप्पा स्वामी (वय 30, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / डी ई 6387) सोसायटीच्या पार्किंगमध्ये गुरुवारी (दि. 2) रात्री नऊच्या सुमारास पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

राजाराम तुकाराम लवटे (वय 35, रा. आंबेठाण रोड, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवटे यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / बी यु 7258) चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये शुक्रवारी (दि. 3) दुपारी साडेपाचच्या सुमारास पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार साडेसहाच्या सुमारास उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.