Hinjawadi : चोरट्यांनी हिंजवडी, देहूरोडमधून दोन दुचाकी चोरल्या; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हिंजवडी आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवलेल्या दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरू नेल्या. याबाबत रविवारी (दि. 15) वाहन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रेखा केशव राठोड (वय 40, रा. पोपट भानुसे चाळ, भानुसे वस्ती, मारूंजी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 12 सप्टेंबर रोजी दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान फिर्यादी रेखा यांनी त्यांची एमएच 14 / एचएल 1365 ही दुचाकी हिंजवडी येथील महिंद्रा बिअर शॉपीसमोर पार्क केली. त्यावेळी चोरट्यांनी चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

तर, रजन हिना खटवान (वय 41, रा. निगडी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजन यांनी शनिवारी रात्री त्यांची एमएच 14 / एफपी 6068 ही दुचाकी तळवडे येथील माकोपोलो प्रा. ली या कंपनीसमोर पार्क केली. चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.