Hinjawadi : कन्स्ट्रक्शन कंपनीतील अधिका-याच्या घरात घुसून बायको अन् मुलाला ठार मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – कन्स्ट्रक्शन कंपनीत रिजनल हेड पदावर काम करणा-या अधिका-याच्या घरात घुसून एकाने अधिका-याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अधिका-याची पत्नी आणि मुलांचे हात बांधून मुलाच्या गळ्यावर चाकूने ओरखडले. कंपनीने केलेल्या कामाचे बिल काढत नसल्याने हा प्रकार केला आहे. ही घटना सोमवारी (दि. 15) दुपारी दोनच्या सुमारास रिजन्सी क्लासिक सोसायटी, बाणेर येथे घडली.

कल्याणी प्रशांत लंके (वय 42, रा. रिजन्सी क्लासिक सोसायटी, बाणेर) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चेतन माळी (रा. सातपाटी रोड, सातपाटी पालघर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी यांचे पती प्रशांत लंके एक्झर्बिया कन्स्ट्रक्शन कंपनीत रिजनल हेड पदावर कार्यरत आहेत. आरोपी चेतन माळी याने कर्जत तालुक्यातील मडाप्प येथे कंपनीचे काम केले आहे. त्याचे चार लाख रुपयांचे बिल कंपनीने काढले नाही. त्यामुळे चेतन याने प्रशांत लंके यांच्या घरात बेकायदेशीररित्या घुसून त्यांची पत्नी आणि मुलाचे हात बांधले.

कंपनीने चेतन माळी याचे बिल लवकरात लवकर न दिल्यास बायको व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये मुलाच्या गळ्यावर चाकूने वरखडले आहे. याबाबत त्यांच्या पत्नी कल्याणी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like