Chikhali : व्यावसायिकांची दहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- विविध कामांसाठी व्यासायिकांकडून वर्क ऑर्डर घेऊन व त्यानंतर कंपनी बंद करून तिघांची दहा लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी सोमवारी (दि. 1) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी विजयकुमार परमानंद श्रीवास्तव (वय 48, रा.केशवनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून शिवशांत अमृत जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी जाधव याने श्रीवास्तव यांना व्यवसायासाठी मशीन देण्यासाठी 7 लाख रुपये घेतले. मात्र वर्कऑर्डरप्रमाणे मशीन न देता फसवणूक केली. तसेच इतर व्यावसायिक सदाशिव आगळे यांच्याकडूनही वर्कऑर्डर घेऊन आगाऊ रक्कम म्हणून दोन लाख रुपये घेतले. तर अंगद शिवणे यांच्याकडून मशीनचे 50 हजार रुपयांचे स्पेअर पार्ट बनवून घेतले. अशा प्रकारे सर्वांचा विश्वास संपादन करून एकूण 10 लाख 07 हजार 272 रुपये घेतले. मात्र वर्कऑर्डर पूर्ण न करता कंपनी बंद केली. तसेच सर्वांची फसवणूक करून पोबारा केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.