Hinjawadi : कंपनीतील माहितीचा अपहार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीतील गोपनिय माहिती इतरांना पाठवून कंपनीचे आर्थिक नुकसान केले. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 जून 2017 ते 12 जुलै 2019 या कालावधीत यान फ्यूचरिझम प्रा. लि. येथे घडली.
संजय भाऊसाहेब गिरवले (वय 39, रा. चिखली) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विशाल उत्तम गायकवाड (रा. बाणेर), शशांक जैस्वाल, टेक इन्व्हेंटो कंपनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल, संजय यांच्या यान फ्यूचरिझम प्रा. लि. या कंपनीत काम करतो. त्याने कंपनीच्या नियमांचा भंग करून कमानीची गोपनीय माहिती ई-मेल आणि व्हाट्स अप द्वारे शशांक जैस्वाल याला पाठवली.
विशाल आणि शशांक या दोघांनी मिळून त्यांच्या टेक इन्व्हेंटो कंपनीच्या माध्यमातून संजय यांच्या यान फ्यूचरिझम प्रा. लि. या कंपनीचे आर्थिक नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.